तुमची त्वचा निरोगी व सुंदर कशी ठेवाल?हल्ली बाजारामध्ये त्वचा सुंदर व निरोगी राहण्यासाठी भरपूर प्रसाधने मिळतात. पण तुमची त्वचा सुंदर व निरोगी राहण्यासाठी तुमच्या राहणीमानाचा जो फायदा होतो तो कुठल्याच “क्रीम" किंवा “ फेशीयल " किंवा “मेक-अप’ किंवा आयुर्वेदीक औषधांनी हवा तेवढा होत नाही.

बर्‍याच लोकांच्या चाळीशीतच डोळ्याखाली काळ्या रेघा उमटायला लागतात. कॉस्मेटीक सर्जनस्‌ च्या मते ५० शी च्या आत चेहऱ्यावर सुरकुत्या येणं हे उन्हामध्ये हिंडणे, प्रदुषण, किंवा सिगरेट ओढणं यापैकी एका किंवा अनेक कारणांमुळे झालेले तोटे असतात. तुमची चेहऱ्यावरची किंवा हाताच्या पृष्ठ भागाची त्वचा तुमच्या शरीरातील आतल्या ( झाकलेल्या ) भागाशी तुलना केली असता ही गोष्ट प्रखरतेने जाणवून येते.

तरूणांमध्ये सध्या प्रसिध्द होणांर यो-यो डायटींग, सतत वायाशी संपर्क किंवा over animated facial expression या कारणांने सुध्दा त्वचेचं premature aging होऊ शकते. Skin-aging चं अजुन एक कारण अनुवंशिकता (genetics) हे असू शकतं ज्यावर आपण काही उपाय करू शकत नाही. तुमची आई किंवा आजी त्यांच्या वयापेक्षा तरूण दिसत असतील तर तुम्ही व तुमची मुलं सुध्दा वय झाल्यावर तरूण दिसाल. अर्थात स्वत:च्या त्वचेची काळजी घेतली तरच. चेहऱ्याची काळजी घ्यावयाला सनस्क्रिन वापरावे.

उन्हामध्ये डोक्यावर टोपी किंव स्कार्फ बांधावा जेणेकरून चेहऱ्यावर ऊन येणार नाही, तंबाखू किंवा सिगारेट न ओढणे ( दुसरा ओढत असल्यास समोर न थांबणे ). यो-यो डायटींग टाळणे इ. प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे.

चेहऱ्यावरील सुरकुत्यांचे प्रकार
त्वचारोग तज्ञ (Dermatologiest) व plastic सर्जन्स च्या मते दोन प्रकारच्या सुरकुत्या चेहऱ्यावर असतात.

एक कायमचे ( स्टॅटीक ) व कधी कधी येणाऱ्या ( डायनामिक) जेव्हा वय वाढल्यामुळे किंवा premature aging मुळे त्वचा पातळ होते व ओढली जाते तेव्हा static wrinkles तयार होतात. डायनॅमिक रींकल्स्‌ ( सुरकुत्या) हे सर्व वयात होतात, अगदी लहान मुलांमध्ये सुध्दा. त्यांना ‘Laugh lines’ असं पण म्हणतात.

जेव्हा चेहर्‍यावरचे स्नायु तात्पुरते आकुंचीत होतात तेव्हा त्वचेचा वरचा पदर दुमडत जातो, त्याला डायमॅनिक सुरकुत्या म्हणतात. हसताना, रडताना, बाकी चेहर्‍यावरचे हावभाव बदलताना ह्या सुरकुत्या तात्पुरत्या पडतात.

सुर्यकिरणांमुळे त्वचेवर होणारं दुष्परिणाम
पाश्‍चात्य देशांमध्ये ऊन्हामध्ये tanning करण्याचं फार वेड आहे. ह्या tanning मुळे त्वचा कोरडी पडते व सुरकुत्या पडतात किंवा अगदी त्वचेचा क्षयरोग (skin cancer) सुध्दा होऊ शकतो. हे सर्व सूर्य किरणांमधल्या अल्ट्रा वायोलेट किरणांमुळे मुळे होतो. वयाच्या १८ व्या वर्षांपर्यंत जवळ जवळ अर्ध्या आयुष्यात होईल एवढं U V exposure होतय असं संशोधकांच म्हणणं आहे.

ऑस्ट्रेलीया मध्ये केलेल्या एका पाहणीमध्ये असं दिसून आले की, पचवीशीतच्या लोकांना सुध्दा चेहऱ्यावर व हाताच्या पृष्ठ भागावर photo-aged त्वचा आहे. हेच भाग सतत U V radiation मुळे झालेले असतात.

एकुण काय, तर उन्हामुळे किंवा मुद्दाम केलेल्या tanning मुळे जे U V radiation होतं ते त्वचेतल्या DNA cells ना हानीकारक आहे. याहून वाईट गोष्ट म्हणजे पृथ्वी वरचा ओझोनचा थर (Ozone layer) कमी होत चालला असल्या कारणाने हे U V radiationवाढत चाललं आहे. त्यामुळे होणारे त्वचेवरचे सूक्ष्म आघात काही वर्षानंतर एकत्र होऊन सुरकुत्या व इतर त्वचेला अपाय होण्यास कारणीभूत ठरतात.

ऊन्हापासून सावधगिरीसाठी सनस्क्रिन lotion/Cream मिळतात. १५ किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात SPF (Skin Protection Factor) असलेलं सनस्क्रिन हे बऱ्याच हानीकारक U V rays filter करतात.

तुम्ही तुमच्या लहानपणी किंवा तरूण असताना जरी हे सनस्क्रिन वापरले नसतील तरी ते आता वापरा, अगदी वर्षभर. बाहेराची कुठलीही कामं करीत असताना अगदी बागकाम, खेळणे, फिरायला जाताना, जॉगींगला जाताना, बीच वर जाताना सनस्क्रिन वापरायला विसरू नका. त्याने UV-A, UV-B चे radiation पासुन तुमची त्वचा सुरक्षित राहते. शरीराच्या सर्व उघड्या राहणाऱ्या भागांवर साधारण बाहेर पडण्यापूर्वी अर्धातास तरी सनस्क्रिन लावावं, घाम आल्यावर किंवा पाहून आल्यावर सुध्दा हे मलम दर ३-४ तासांनी परत परत लावावं.

हाताची पृष्ठ बाजू विसरू नका व आभाळ आलं असलं तरी फसू नका. UV ची किरणं आभाळालास भेदून तुमच्या त्वचेला हानी पोचवू शकतात. डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा पदर असला तर निश्‍चित फायदा होतोच.

धुम्रपानामुळे झालेलं Skin-aging
धुम्रपानामुळे होणारे Lung cancer, Emphysema हृदयविकार व बाकीचे आजार जगजाहीर आहेतच. पण धुम्रपानामुळे चेहरा खराब होणे हे मात्र अजुन फारसं कोणाच्या लक्षात रहात नाही,. धुम्रपानाच्या धुरा मुळे जे रसायन ओढले जातात त्यामुळे त्वचेमधील blood vessels दबून जातात. ज्यामुळे हवेमधला oxygen व nutrient supply कमी होतो, व त्यामुळे facial tissues नाजूक होतात. धुम्रपान केल्यानंतर साधारण पणे तासभर तरी हे sel blood vess दबलेले राहतात.

बरेच वर्षाच्या धुम्रपानाच्या सवयीमुळे oxygen व बाकीच्या nutrients च्या कमतरतेमुळे त्वचेचा अकालीन सुरकुत्या पडायला लागतात. त्वचेची elasticity (त्वचा ओढल्यावर पूर्ववत होणे) कमी होते. अश्या लोकांची त्वचा निस्तेज दिसते. सिगरेट सारखी तोंडात असल्यामुळे तोंडा भोवती सुध्दा सुरकुत्या पडतात. सिगारेट च्या धुरामुळे सारखे डोळे बारीक केले जातात. त्यामुळे पापण्यांना सुध्दा सुरकुत्या पडतात.

Premature skin aging ची कारणे
डायटींग आणि स्कीन एजींग.
सध्याचं यो-यो डायटींग (सारख वजन कमी जास्त करणे) मुळे त्वचा ओढली जाते व त्यामुळे त्वचेची elasticity कमी होते. त्यामुळे आपले वजन योग्य वजनाच्या ५ ते १० पाउंड कमी जास्त रहावे व डायटींग चे कुठलेही अघोरी उपाय करू नयेत.

तुमचे चेहऱ्यावरचे भाव यांचा त्वचेवरील परिणामः त्वचेला, एका अर्थाने “स्मरणशक्ती” असते. एकाच प्रकारे त्याची घडी सारखी पडत असेल (स्नायुंच्या अकुंचीतपणा मुळे) तर तिथे कायमचे स्टॅटिक लाइन्स व्हायला लागतात. उदाहरणार्थ खलाशी लोकांना सारखं उन्हामध्ये व वार्‍यामध्ये पाहून डोळे बारीक करायची सवय असते, त्यामुळे डोळ्यांभोवती सुरकुत्या जास्त असतात. किंवा काही चेहरे कायम हसते वाटतात तर काही चेहरे कायम रडके वाटतात. अर्थात याचा उपाय म्हणजे उन्हामध्ये गॉगलचा वापर करणे किंवा आपल्या चेहर्‍यावरचे हावभाव कसे आहेत याकडे जास्त लक्ष देणे. आपला चेहर्‍याच्या स्नायुंना उगी ताण देत आहोत का हे पाहणे व चेहरा थोडासा मुद्दाम प्रयत्‍नपूर्वक ताणरहित ठेवणे.

तुमचे वजन योग्य ठेवणे व धुम्रपाना पासून दूर राहिले की तुम्ही सशक्त राहतातच, शिवाय तुमची त्वचा सुध्दा सुंदर राहते. बाकी खालील काळजी पण जरूर घेणे.

शक्यतो दुपारी १० ते ३ या वेळात ऊन्ह्मध्ये जाण्याचे टाळावे, कारण या वेळेला UV rays खूप तीव्र असतात. घराबाहेर पडण्याच्या साधारण अर्धातासापूर्वी १५ एस. पी. एफ. किंवा जास्त एस. पी. एफ. असलेलं सनस्क्रिन वापरावे.

पोहचल्यानंतर किंवा घाम आल्यानंतर सनस्क्रिन परत लावावे. सूर्यस्नान करू नये.

समुद्र किनाऱ्यावर असाल तर छत्री वापरावी व सनस्क्रिन पण वापरावे कारण वाळू व पाण्यावर पडलेल्या किरणांचे प्रतिबिंब सुध्दा त्वचेला हानीकारक असते.

चेहरा शक्यतो टोपी, पदर किंवा रूमालाने झाकणे. शिवाय ऊन्हामध्ये जाताना लांब बाह्यांचे कपडे घालणे.

सनस्क्रिन असलेले मेक-अप ची प्रसाधने वापरावीत. धुम्रपानापासून दूर रहावे. ऊन्हामध्ये बाहेर पडताना गॉगल्स वापरा. त्वचा कोरडी पडू नये म्हणून मॉइश्‍चरायझर्स वापरावे. मॉइश्‍चरायझर असलेले साबण वापरावे. थंडीच्या दिवसांमध्ये घरामधली हवा कोरडी असते अशा वेळेस humidifiers वापरावे. ऊन्हामुळे जर तुमच्या त्वचेला डाग पडत असतील तर त्वचारोग तज्ञांकडून ‘topical tretinoin emollient' असलेले क्रीम घ्यावे. शिवाय alpha hydroxy acid बद्दल पण विचारावे त्याने सुध्दा photo aging कमी होत

Post a Comment

0 Comments