नोकरी करणारी स्त्री व आरोग्य


  • काम करताना आपण विविध ढबीत बसून बघावे व त्यानंतर ठरवावे की, नेमक्या कोणत्या ढबीत बसल्यावर आपला देह हा अवघडला जात नाही.
  • पाठीस पोक न काढणे, अंधारात काम न करणे, खूप पूढे वाकून बसून काम न करणे, पायावर पाय टाकून न बसणे, जर काँप्युटरवर काम करताना ऍडजेस्टेबल खुर्चीचा वापर करावा.
  • आपण काम करताना ज्या खूर्चीवर बसतो, ती आपल्या कंबरेखालील भागास आधार देणारी हवी.
  • आपल्या कंबरेस जर आधार मिळत नसेल, तर कुशन ठेवून तो द्यावा.
  • जर लघवीस लागली, तर शक्यतो ती दाबून ठेवू नये, कारण यामुळे देखील काही अपाय होऊ शकतो.
  • जेवण गरम राहील अशा टिफिनमध्ये न्यावे. यात हिरव्या भाज्या, दही डाळ इ. समावेश असावा.
  • सारखा चहा, कॉफीवर जोर देवू नये. तसेच चहाबरोबर खाण्यास मोडावलेली कडधान्ये (उदा. मूग,मटकी, सोयाबीन्स्‌) न्यावीत.
  • काँप्युटरवर वा टाइपरायटरवर काम करणार्‍या स्त्रियांनी नेहमी लक्षात ठेवावे की, हातांना खूप ताण बसून देऊ नये. हात थोडे ढिले सोडून व हलक्या हातानेच टाइप करावे.
  • जेव्हा बसाल, तेव्हा आपली कंबर, गुडघे, पायांच्या पोटर्‍या यावर दाब पडेल, अशा प्रकारे बसणे टाळावे. हात व पायांची बोटे हालत राहतील, असे काम करावे.
  • नोकरी करणार्‍या स्त्रियांच्या आरोग्य व सौंदर्य यावर घाला घालणाऱ्या मायग्रेन, कंबर, पाठदुखी, फ्रोझन शोल्डर यासारख्या अनेक विकरांची कारणे यात असतात आणि यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणूनच वरील बऱ्याच सूचना विचारात घ्याव्यात.

Post a Comment

0 Comments