अ‍ॅलर्जीमाणसाचे शरीर जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी अती संवेदनाशील असते, जेव्हा त्या विशिष्ट गोष्टीने माणसाच्या शरीरावर काही प्रतिक्रीया दिसतात तेव्हा त्याला अ‍ॅलर्जी आहे असे म्हणतात. अ‍ॅलर्जी ही सहसा त्वचा, फुफ्फुसे, सूज, खाणे-पिणे ह्या गोष्टींतून दिसून येते. 

अ‍ॅलर्जी ह्या शब्दाला मराठी भाषेत ’वावडं’ असा शब्द आहे. एखाद्या गोष्टीचे वावडे असणे म्हणजेच अ‍ॅलर्जी असणे होय. परंतु आत्ताच्या बदलत्या मराठी बोली भाषेतही अ‍ॅलर्जी हाच शब्द रुळला आहे. अ‍ॅलर्जी ही सर्वांमधेच नसते. पण काहीजणांची प्रतिकार शक्ती एखाद्या पदार्थाला किंवा अ‍ॅलर्जी सदृष गोष्टींना प्रतिसाद देऊ शकत नाही. आणि त्याचे दुष्परिणाम वेगवेगळ्या मार्गांनी दिसून येतात. त्या अ‍ॅलर्जीक गोष्टीशी लढा देण्यासाठी शरिरातील बॅक्टेरिया, विशिष्ट विषाणू आणि टॉक्सिन्स सज्ज बनतात, मात्र त्याचे परिणाम माणसाच्या शरीरावरच दिसून येतात.

अ‍ॅलर्जी ही ब-याचदा आपल्या नेहेमीच्या खाण्याच्या पदार्थांपैकी किंवा सानिध्यात येणा-या गोष्टींपैकीच कसली ना कसले होते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती (immune systeam) जेव्हा नेहमीच्या अपायकारक नसणा-या गोष्टीला उलट प्रतिसाद देते तेव्हा माणूस गोंधळून जातो. आपल्याला अ‍ॅलर्जी आहे हे समजायलाच खूप वेळ जातो, त्यामुळे उपचार घेण्यास किंवा अ‍ॅलर्जी असणा-या गोष्टीपासून दूर रहाण्यासही त्या व्यक्तीला उशिर लागतो, आणि तो पर्यन्त त्या अ‍ॅलर्जिक गोष्टीचे परिणाम होत रहातात.

अ‍ॅलर्जी अनेक प्रकारची असते. आजच्या प्रदुषणयुक्त जगात ब-याच जणांना धुळीची अ‍ॅलर्जी असते, विशिष्ट औषधी परागकणांची असते. पण जास्तीत जास्त अ‍ॅलर्जी ही विशिष्ट खाद्यपदार्थाची असते.


Post a Comment

0 Comments